यंदा गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया | पुढारी

यंदा गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  यंदा पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया पसरली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मूर्तिकार सध्या गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविताना दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींची 50 टक्केदेखील आगाऊ बुकिंग झाली नसल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. गणेशोत्सवाला अवघे 15 दिवस बाकी आहेत. अनेक कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती रंगविण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. सध्या मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याचा परिणाम गणेशोत्सवावर झालेला दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींचे 50 टक्केदेखील बुकिंग झाले नाही.

याबाबत आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील मूर्तिकार सुनीता शिंदे म्हणाल्या, ‘यंदा गणेशोत्सवाची आम्ही तयारी पूर्ण केली आहे. परंतु तब्बल तीन महिने पावसाने दडी मारल्याने शेतकरी, व्यापारीवर्गात नाराजीचे वातावरण दिसत आहे. गतवर्षी गणेशोत्सवाला एक महिना अवकाश असता देखील मोठ्या प्रमाणावर लहान-मोठ्या मूर्तींची आगाऊ बुकिंग झाली होती. परंतु यंदा गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला तरी मंडळे, गणेश भक्तांकडून गणेश मूर्तींचे बुकिंग झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आले होते. तब्बल दोन वर्षे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. त्यातून अजूनही कारागीर, मूर्ती व्यवसाय सावरले नाहीत. त्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाली असून, पुन्हा मूर्तिकारांवर आर्थिक संकट आले आहे.

हेही वाचा :

पुणे : ‘पीएमआरडीए’ हद्दीतील प्रवाशांसाठीही मासिक पास

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या हरित प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

Back to top button