टोळीयुद्ध खून प्रकरण : यल्ल्या आणि त्याच्या इतर १९ साथीदारांवर मोक्का

टोळीयुद्ध खून प्रकरण : यल्ल्या आणि त्याच्या इतर १९ साथीदारांवर मोक्का

पुढारी वृत्तसेवा : टोळीयुद्धातील खून प्रकरणातील गुन्हेगार यल्ल्या आणि त्याच्या इतर १९ साथीदारांवर पुणे पोलिसांनी अखेर मोक्का कारवाई केली आहे. नितीन म्हस्के खून प्रकरणातील यल्ल्या उर्फ सागर कोळणटी हा मुख्य आरोपी आहे.  पुण्यातील मंगला टॉकीज बाहेर नितीन म्हस्के ची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.

तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून नितीनची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी यल्ल्या उर्फ सागर कोळनट्टटी आणि इतर साथीदारासह गुन्हा दाखल होता.  सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड असे आरोपींचे नाव असून या सगळ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या सगळ्यांवर आता संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news