शिवगंगा खोर्‍यात विजेचा लपंडाव | पुढारी

शिवगंगा खोर्‍यात विजेचा लपंडाव

खेड शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिवगंगा खोर्‍यामध्ये रोज सुमारे पाच ते सहा वेळा वीज गायब होत असून, याचा नाहक त्रास स्थानिकांसह व्यावसायिक, शेतकरी, खासगी कंपनी व प्रामुख्याने सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर होत आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे विजेचा हा खेळखंडोबा कधी संपेल, अशी चर्चा आता या भागात रंगू लागली आहे.

रोज सकाळी शिवगंगा खोर्‍यातील गावात पिण्याचे पाणी सार्वजनिक विहिरीमधून पुरविले जाते. सकाळी दोन तासात पाणीपुरवठा केला जातो; मात्र विजेच्या लपंडावाने दोन तासांचे आठ तास होत आहेत, तर काहींना विजेअभावी पाणीपुरवठा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिवगंगा खोर्‍यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वात जास्त आर्थिक फटका या कंपन्यांना बसत असून, रोजची घरगुती खासगी कामे विजेअभावी होत नसल्याचे दिसून येत आहे.

आमच्या गावातील पाच एकर जमीन महावितरण विभागाला उपकेंद्रासाठी दिली आहे; मात्र त्याचा गावाला तसेच या भागाला काहीच उपयोग होत नाही. गावाला साधा पाणीपुरवठासुद्धा करता येत नसल्याने आता मात्र संबंधित कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.

अण्णा दिघे, सरपंच, खेड शिवापूर

काही ठिकाणी पक्ष्यांचा जास्त वावर आहे. त्यामुळे ते विजेच्या तारांवर बसून वीज खंडित होत आहे. वीज खंडित झाली की आम्ही तत्काळ काम सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करतो.

नवनाथ घाटुळे, अधिकारी, महावितरण

हेही वाचा

बेळगाव: हिरेकोडी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ८५ जण अत्यवस्थ

काळम्मावाडी आमची रक्तवाहिनी; सीमा भागातील नेत्यांच्या भावना

यंदाचा ऑगस्ट 123 वर्षांतील सर्वात कोरडा

Back to top button