

सासवड : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांची महत्त्वाकांक्षी पाणी योजना कार्यान्वित झाली असून, या गावांमध्ये नुकतेच पाणी पोहोचले आहे. 118 कोटी रुपये खर्चून जवळपास 4 लाख लोकांची तहान भागवणारी ही योजना आहे. या वेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते वॉल्व्ह फिरवून योजनेची चाचणी घेण्यात आली आणि भेकराईनगर, गंगानगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती, तुकाईदर्शनसह परिसरातील घराघरात नळाद्वारे पाणी वाहू लागले.
1993 ते 2023 तब्बल तीन दशकांची पाणीबाणी संपल्याने चाचणी यशस्वी होताच उपस्थित नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व करताना 118 कोटींची पाणी योजना इथे मंजूर केली. शिवतारे आमदार असताना तब्बल 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले; पण 2019 ला त्यांच्या पराभवानंतर या योजनेच्या कामाला पुन्हा ब—ेक लागला. अवघ्या 25 कोटींसाठी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे 5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याची योजना रखडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरात शिवतारे यांनी हा 25 कोटींचा प्रश्न सोडवला आणि योजना पूर्ण केली. आजच्या चाचणीनंतर बहुतांश भागाला पाणी पोहोचले असून, हळूहळू सर्वच भागांत पाणी वितरित होणार आहे.
हेही वाचा :