पिंपरी : चालिहो समाप्तीनिमित्त घाटावर गर्दी | पुढारी

पिंपरी : चालिहो समाप्तीनिमित्त घाटावर गर्दी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सालाबादप्रमाणे यंदाही सिंधीबांधवांनी मोठ्या आनंदाने चालिहो समाप्तीनिमित्त पिंपरीतील नदी घाटावर गर्दी केली होती. चालिहो उत्सवात सिंधी समाजबांधव चाळीस दिवस उपवास करून पूजा, भजन, कीर्तन, संतसंग अशा प्रकारे चालिहो साजरा करतात आणि विषेश म्हणजे या दिवसांत समाजात बंधूता निर्माण होण्यासाठी संदेश देत असतात.

यानिमित्त घाटावर भाविकांनी गर्दी करून कणकेचा पंचमुखी दिवा (बैराना) नदीमध्ये सोडला. दरवर्षीप्रमाणे बाबा छतुराम झुलेलाल मंदिरात चाळीस दिवसांसाठी ज्योत प्रज्वलित ठेवण्यात आली होती. ज्योतीच्या दर्शनासाठी सिंधीबांधवांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेतून नदीकाठावरील झुलेलाल मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सिंधी समाजातील विविध सामाजिक संघटना, आबालवृद्ध व तरुण – तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. शेकडो दिवे पवना नदीपात्रात सोडण्यात आले.

हेही वाचा

भारतात आहे जगातील दुसर्‍या क्रमांकाची लांब भिंत

कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार ; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

अफगाणिस्तानचा कांदा अमृतसरच्या बाजारात!

Back to top button