जुन्नरला आवक घटली; बाजारभाव वधारले | पुढारी

जुन्नरला आवक घटली; बाजारभाव वधारले

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात केंद्राने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केल्यानंतर कांदा दरात मोठी घट झाली होती. मात्र, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची केंद्राची घोषणा, तसेच कांदा आवक घटल्यामुळे रविवारी (दि. 20) जुन्नर लिलावात कांदा दरात वाढ झाली. या वेळी जुन्नर आवारात केवळ 7 हजार 337 गोण्यांची आवक झाली असून, प्रतवारीनुसार गोळा कांद्याला 240 ते 260 प्रति 10 किलोस बाजारभाव मिळाले. दरम्यान, नाफेड संपूर्ण देशभरात सुमारे 2 लाख मेट्रिक टन 2 हजार 410 कांदा खरेदी करणार आहे.

मात्र, नाफेडची खरेदी केंद्रे ही तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असावीत, अशी मागणी कांदा अडतदार भगवान घोलप यांनी केली आहे. घोलप म्हणाले कांद्याच्या दरात नेहमीप्रमाणे उतार-चढाव होत असतो. सत्ता गेल्यामुळे काही पक्षांचे नेते आंदोलन करून शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या काळात आजपेक्षाही कमी बाजार होते. कांदा निर्यातीवर अतिरिक्त शुल्क लावणे चुकीचे आहे; मात्र त्यामुळे दरांमध्ये फारसा फरक पडला नाही, असा दावा त्यांनी केला.

Back to top button