महात्मा फुले योजनेची वाढीव तरतूद कागदावरच | पुढारी

महात्मा फुले योजनेची वाढीव तरतूद कागदावरच

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार, भरमसाट बिले यामुळे सामान्यांना खर्च डोईजड होतो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे. योजनेची प्रतिकुटुंब मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीच झालेली नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत याआधी 396 आजारांच्या उपचारांसाठी कवच मिळत होते. आता आणखी 360 आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, योजनेअंतर्गत 1356 आजारांवरील उपचारांचा खर्च मिळू शकणार आहे.

मात्र, अंमलबजावणीला उशीर का, अशा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. योजनेची मर्यादा वाढवण्याच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून सूचना आल्या नसल्याचे जिल्हा समन्वय समितीतर्फे सांगण्यात येत आहे. राज्याच्या या वर्षीचा अर्थसंकल्पात मर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 28 जुलै रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामध्ये आजारांची संख्या, रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे नमूद केले. आता शासनाच्या जाहिरातींमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढल्याचे दाखवले जात आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण वाढीव मर्यादेपासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

पोलिसी खाक्या दाखवला अन् इथे गुन्हेगारी चालते म्हणणारा तासाभरात आला गुडघ्यावर !

पुणे : कचरा प्रक्रियेसाठी 17 अधिकृत संस्था ; इतर संस्थांना काम दिल्यास महापालिकेची कारवाई

Back to top button