पुणे : सदनिकेच्या विक्रीमध्ये कट रचून फसवणूक; गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : सदनिकेच्या विक्रीमध्ये कट रचून फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सदनिकेच्या विक्री प्रकरणात कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर न्यायालयाच्या आदेशान्वये येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सोनवणे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला. याबाबत ज्ञानेश्वर शिवाजी शेळके (29, रा. शांतीरक्षक सोसायटी, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, प्रकाश सोनवणे आणि रोहित सोनवणे यांनी संगनमत करून व कट रचून त्यांची सदनिका अमोल शेलार व जयश्री यांना विकलेली असताना फिर्यादी शेळके यांना खोटी माहिती दिली. त्या सदनिकेचे कॅन्सलेशन डीड झालेले नसताना ती सदनिका फिर्यादी यांना विकून त्यांच्याकडून 12 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांनी महानगरपालिकेची बनावट टॅक्स पावती बनवून शांतीरक्षक सोसायटीचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्तासाठी वापरले. पुणे महापालिकेचे 2023 पासून आजपर्यंत 2 लाख रुपये थकीत असून व शांतीरक्षक सोसायटीमधील मेन्टनन्सचे 70 हजार ते 1 लाख रुपये थकित असताना ही माहिती शेळके यांच्यापासून लपवली. फिर्यादी व त्यांच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करून 37 लाख रुपये मागत असल्याने फिर्यादींची, शासनाची व शांतीरक्षक सोसायटीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Sunny Deol : सनी देओलला दिलासा, बँकेने जुहू बंगल्याची लिलावाची नोटीस मागे घेतली

दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

Back to top button