

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या 20 महिलांसह 261 अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने 16 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. या तुकडीतील प्रशिक्षणार्थींचा आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आयएनएस शिवाजी येथे अग्निवीरांच्या सोळा आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण झाले. या तुकडीत भारतीय तटरक्षक दलातील 10 प्रशिक्षणार्थी आणि मित्रदेशांतील सहा प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.
त्यांना व्यावसायिक, शैक्षणिक, खेळ, परेड आणि संघटित अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना विविध अभियांत्रिकी उपकरणे, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण, लहान शस्त्रे हाताळणे आणि गोळीबार यावर वर्ग आणि व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. गुणवंत अग्निवीरांमध्ये हिमांशू बंगा, गुरसेवक सिंग, अस्मिता चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा :