सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोर्‍यात | पुढारी

सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोर्‍यात

पेठ : पुढारी वृत्तसेवा :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पाऊस नसतानाही बटाटा पीक हवेतील गारवा यामुळे ऐन फुलोर्‍यात आले आहे. आता बटाटे पिकास फुले आल्याने शेतीचा नजराणा पाहण्यासाठी शेतकरी आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थूगाव, भावडी आदी गावांत सर्वत्र बटाटा फुलोर्‍यात आलेला दिसून येत आहे. पीक जोमदार आले आहे; मात्र मातीत असलेल्या मुळातील बटाट्यांची साइज वाढण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सातगाव पठार भागातील साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा हे मुख्य पीक शेतकर्‍यांनी घेतले आहे. बटाटा पिकास पीक विमा योजना अद्याप मंजूर झाली नाही. येथील शेतकरी हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला झाला तर पीक चांगले येते. यापूर्वी कुरवंडी भागात डोंगर जवळ असल्याने थंड वारे व अधूनमधून हलकासा पाऊस पडत आहे. पूर्वेकडील गावांना अद्याप पाऊस नसल्याने व ऐन फुलोर्‍यात आलेल्या बटाटा पिकाची बटाटा साइज वाढ होण्याची आशा आता धूसर झाली आहे.

Back to top button