प्रसिद्ध मंदिरांमध्ये चोऱ्या करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद | पुढारी

प्रसिद्ध मंदिरांमध्ये चोऱ्या करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये चोऱ्या करणारी आंतरजिल्हा टोळी तिच्या म्होरक्यासह ताब्यात घेण्यामध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले. या टोळीवर विविध ठिकाणी ३२ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून साडे चार लाखांचे देवांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

जुन्नरचे ग्रामदैवत सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये दि. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीच्या घटनेमधील चांदीची मूर्ती, चांदीचे कान, छत्री या वस्तू चोरट्यांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. भास्कर खेमा पथवे (रा. नांदूर दुमाला संगमनेर), सोमनाथ शिवाजी भुतांबरे (रा.समशेर पूर अकोले) आणि राजेंद्र रगुनाथ कपिले (रा. संगमनेर) या सोनारास ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून चोरीचे देवाचे दागिने या सोनाराने विकत घेतले होते. ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा , पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेल्ट, काठीने मारहाण; पोलिसांत घेतली धाव

Sambhaji Bhide | संभाजी भिडे पुन्हा वादात! सांगलीत तिरंगा ऐवजी काढली भगवा पदयात्रा

Back to top button