नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो उलटला; रहदारी ठप्प | पुढारी

नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो उलटला; रहदारी ठप्प

ओतूर: पुढारी वृत्तसेवा : नगर – कल्याण महामार्गावरील मढ (ता.जुन्नर) हद्दीतील मढ- पारगाव खिंडीमधील वळणावर एक टेम्पो ( एम एच ११ ए एल. २९०८) उलटल्यानंतर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती, अशी माहिती या मार्गावर प्रवास करणारे टोकावडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप औटी यांनी दिली. अपघातग्रस्त टेम्पो कडबा कुट्टी, मुरघास घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना डाव्या बाजूला टेम्पो उलटला. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना  मंगळवारी सकाळी घडली.

या अपघातामुळे खिंडीच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला. व वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

सद्यस्थितीत सलग सुट्ट्या असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गावरून ये-जा करीत आहेत. परिणामी कल्याण- नगर मार्गावर वाढती रहदारी दिसून येत आहे.

हेही वाचा 

Back to top button