पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गॅसदाहिनीत पुन्हा बिघाड ! तब्बल दीड तासाने झाले अंत्यसंस्कार | पुढारी

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गॅसदाहिनीत पुन्हा बिघाड ! तब्बल दीड तासाने झाले अंत्यसंस्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंटच्या अत्याधुनिक गॅसदाहिनीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दीड तास मृतदेहावर अंत्यसंस्कारच होऊ शकले नाहीत. अर्ध्यावर बंद झालेला दरवाजा उपस्थित कर्मचारी आणि अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या सुमारे 20 जणांनी प्रयत्न करून उघडला. शनिवारी कोंढवा येथील 91 वर्षीय मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुक्तिधाम गॅसवाहिनी येथे आले होते. त्या वेळी अंत्यसंस्कारांचा विधी झाला.

त्यानंतर मृतदेह दाहिनीत ट्रॉलीवर ठेवला. पण, ट्रॉली जाम झाल्याने मृतदेह आत राहिला. मात्र, ट्रॉली मागे आली नाही. ही गोष्ट तेथील कर्मचार्‍याच्या लक्षात आल्यावर त्याने तत्काळ दाहिनीची अग्निदहन मुख्य कळ बंद केली. त्यामुळे मृतदेह जळाला नाही. चारचाकी गाडीचा जॅक, कटावणी, मोठी लोखंडी सळई आदीचा वापर करीत अखेर दाहिनीचे झाकण उघडण्यात यश आले.

हेही वाचा

कोल्हापूर : गोवंश हत्याप्रकरणी दोघांना अटक

हिमाचल प्रदेश : सोलनमधील ढग फुटी; दोन घरे, एक गोठा गेला वाहून

मेट्रो प्रवासासाठी मोठी गर्दी; विकेंडला हजारो पुणेकरांनी घेतला आनंद

Back to top button