पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणाचं सरकार येईल, हे सांगता येणार नाही. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, देशात 1974 ते 1950 या दरम्यान देशाचे विभाजन झाले. त्यात कत्तली झाल्या, असा चुकीचा इतिहास घडलेला असतो, तो विसरून नव्याने घडवायचा असतो. परंतु, त्याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी स्मृती दिवस साजरा केला जाणार असुन, हे घातक असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 1950 मध्ये भाजप नव्हते, असे सांगितले आहे, त्यामूळे त्यांच्या बुध्दीची कीव येते, 1923 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे, त्यामूळे अमित शहा हे आरएसएसच्या शाखेत गेले की, असा सवाल करतात. या सर्व प्रकारातून नव्या पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेही आंबेडकर म्हणाले.
राज्यातील सध्याच्या राजकारणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, महविकास आघाडीकडून निमंत्रण आल्यास त्यावर विचार केला जाईल. उद्धव ठाकरे यांचा मला मॅसेज आलेलं आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका, त्यामूळे आम्ही निवांत आहोत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस मधील सध्याच्या राजकारणावर विचारले असता ते म्हणाले, शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली बैठक ही, जयंत पाटील यांचे नातेवाईक असलेले भगवंत पाटील यांना इडीची नोटिस आली आहे, त्याविषयी ती बैठक होती. त्यामध्ये काय चर्चा झाली, माहित नाही, असे आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा