रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गांत बदल | पुढारी

रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गांत बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जळगाव-भुसावळ विभागात ब्लॉक घेऊन तिसरा रेल्वेमार्ग आणि यार्ड रिमॉडेलिंगशी संबंधित आवश्यक तांत्रिक कामे केली जात आहेत. त्यामुळे 12 आणि 14 ऑगस्टला सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11039), 13 ऑगस्टला सुटणारी नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114), जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (02132) रद्द करण्यात आली आहे. तर 14 ऑगस्टला सुटणारी पुणे-नागपूर (12113), पुणे-जबलपूर (02131), नागपूर-पुणे (12136), गोंदिया-कोल्हापूर (11040 ) तसेच 15 ऑगस्टला सुटणारी पुणे-नागपूर एक्स्प्रेस (12135) सुध्दा रद्द करण्यात येणार आहे. तसेच, 16 ऑगस्टला सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही (11040) रद्द असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

या गाड्यांच्या मार्गात बदल…

  • 14 ऑगस्टला सुटणारी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12221) आणि हावडा-पुणे (12129) लोणावळा-पनवेल-वसईरोड-उधना-जळगाव या परिवर्तित मार्गाने धावेल.
  • 14 ऑगस्टला सुटणारी पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (11077), पुणे-दानापूर एक्स्प्रेस (12149), वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) लोणावळा-वसईरोड-उधना-जळगाव या परिवर्तितमार्गे धावेल.
  • 13 ऑगस्टला सुटणारी दानापूर-पुणे एक्स्प्रेस (12150), जसिडीह-पुणे एक्स्प्रेस (11428 ), हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस (12130) जळगाव- वसईरोड-लोणावळा या परिवर्तितमार्गे धावेल.
  • 13 ऑगस्टला सुटणारी जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस (11078) जळगाव-वसईरोड-कल्याण-लोणावळा या परिवर्तितमार्गे धावेल.
  • 14 ऑगस्टला निघणारी हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेस (12782) इटारसी-नागपूर-बल्लारशाह या परिवर्तितमार्गे धावेल.

हेही वाचा

सुट्टीच्या हंगामात ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ रद्द

राजकीय धुमशान : शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज नेते आज पुण्यात

गुरू-शिष्याची पुन्हा होणार भेट; शरद पवार, दिलीप वळसे पाटील आज पुण्यात

Back to top button