पिंपरी : मोहननगर, चिखलीतील गृहप्रकल्पांच्या कामांना मंजुरी | पुढारी

पिंपरी : मोहननगर, चिखलीतील गृहप्रकल्पांच्या कामांना मंजुरी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका मोहननगर तसेच, चिखली सेक्टर क्रमांक 17 व 19 येथील गृहप्रकल्पांमध्ये विद्युत व इतर कामे करण्यात येणार आहे. त्या खर्चासह विविध विकासकामांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची बुधवारी (दि.9) मंजुरी दिली आहे.

सल्लागार नियुक्तीस मान्यता

बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. पिंपळे सौदागर परिसरातील गारमाळा कॉलनी येथील तसेच, चिखली परिसरातील रस्ते बनविण्यासाठी सल्लागार नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. परघळे कॉर्नर ते स्वराज्य गार्डनपर्यंतचा 12 मीटर रुंदीचा डीपी रस्ता, नॅचरल आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटीपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 19 मधील नाल्यांची सुधारणा, प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामी समर्थ कॉलनी क्रमांक 1 व 2 मधील रस्त्यांचे, त्रिवेणीनगर चौक ते कुदळवाडी चौकापर्यंत स्पाईन रस्त्यांचे, तुळजाईवस्ती परिसरातील तसेच प्रभाग क्रमांक 3 मोशी डुडुळगाव येथील विविध विभागांमार्फत खोदण्यात आलेल्या ट्रेंचेसचे डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पालिकेच्या प्राधिकरण, निगडी येथील सेक्टर क्रमांक 27 येथील नर्सरीसाठी माळी व मजूर कर्मचारी पुरविणे, सर्व रुग्णालयांकरिता उपकरणे खरेदी करणे, नवीन थेरगाव व भोसरी रुग्णालय येथे नेत्र विभागाकरिता उपकरणे खरेदी करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागाकरिता आवश्यक सर्फेस कोटिंग करणे, करसंकलन विभागाकडील मिळकतकर संगणक प्रणालीची दुरुस्ती व देखभाल करणे. प्रभाग क्रमांक 12 मधील कॅनबे चौक ते स्पाईन रस्त्याला जोडणारा 18 मीटर रुंद डी.पी रस्ता विकसित करणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करणे, आदी खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.

रुग्णालयासाठी होणार उपकरणे खरेदी

प्रभाग क्रमांक 15 मधील बसवेश्वर महाराज उद्यान मोकळ्या जागेवर नव्याने विकसित केलेल्या उद्यानाचे देखभाल काम करणे, मोरवाडी, पिंपरी येथील समाज विकास विभगाकरिता दिव्यांग भवनासाठी आवश्यक असलेली साधने खरेदी करणे, दिव्यांग भवनामध्ये मेस्को मार्फत सुरक्षा व्यवस्था करणे, शहरात विविध ठिकाणी वेस्ट टू वोंडर-टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्मित करून उद्यान विकसित करणे,

हेही वाचा

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी उजाडणार 2025

पिंपरी : कुरिअरच्या नावाखाली महिलेला 37 लाखांचा गंडा

नाशिक : दुहेरी हत्‍याकांडाने संजिवनगर परिसर हादरला; तीन अल्‍पवयीन ताब्‍यात

Back to top button