पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत वर्क फ्रॉम होम राहून पैसे कमवता येईल, असे सांगत वेगवेगळी टास्क देऊन तब्बल 16 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजेंद्र पाटील (29, रा. तळेरानवाडी, थेऊर रोड, केसनंद, पुणे ) यांनी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक, तसेच टेलिग्राम यूजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा 30 एप्रिल 2023 ते 16 मे यादरम्यान ऑनलाइन स्वरूपात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेंद्र पाटील यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मोबाईवरील व्यक्तीने पाटील यांना टास्क जॉब वर्क फ्रॉम होम राहून अल्पावधीत चांगल्या प्रकारे पैसे कमवता येतील, असे सांगितले. एका टेलिग्राम ग्रुप मध्ये तक्रारदार यांचा क्रमांक समाविष्ट करून त्यांना इतरांना कशाप्रकारे लाभ मिळत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून विश्वास संपादन करून फॉलो आणि लाईकचा टास्क पूर्ण करायला लावणे, तसेच ते मिळवण्याकरिता खाती व्हेरिफाय करायच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस सांगून 16 लाख 78 हजार रुपये विविध बँक खात्यावर भरण्यास सांगितले. मात्र, हे पैसे भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न करता तसेच कमवलेले पैसे न देता फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news