चाकण(पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, मेथी व गाजराची उच्चांकी आवक झाली. कांद्याची आवक घटूनही भावात घट झाली. लसणाची आवक स्थिर राहून भावही स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो व कोबी यांची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची मोठी आवक झाली. कोथिंबीर, शेपू व पालकाची आवक स्थिर राहिली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 500 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1,600 रुपयांवरून 1,500 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढली व बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक 175 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार 500 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा : एकूण आवक – 1,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 132 क्विंटल (7,000 ते 9,000 रुपये), कोबी – 170 क्विंटल ( 1,000 ते 1,500), फ्लॉवर – 78 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी – 99 क्विंटल (2,000 ते 3,500), भेंडी – 64 क्विंटल (2,500 ते 4,000), दोडका – 38 क्विंटल (4,500 ते 5,500), कारली – 41 क्विंटल (3,500 ते 4,500), दुधीभोपळा – 14 क्विंटल (1,000 ते 2,500), काकडी – 93 क्विंटल (800 ते 1,500), फरशी – 14 क्विंटल (5,000 ते 7,000), वालवड – 42 क्विंटल (3,000 ते 4,500), गवार – 32 क्विंटल (7,000 ते 8,000), ढोबळी मिरची – 82 क्विंटल (3,000 ते 6,000), चवळी – 13 क्विंटल (2,000 ते 4,000), वाटाणा – 10 क्विंटल (12,000 ते 15,000), शेवगा – 14 क्विंटल (2,000 ते 4,000), गाजर – 110 क्विंटल (1,000 ते 1,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेला भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण 35 हजार 600 जुड्या (200 ते 600 रुपये), कोथिंबीर – एकूण 16 हजार 200 जुड्या (100 ते 500 रुपये), शेपू – एकूण 2 हजार, 620 जुड्या (400 ते 800 रुपये), पालक – एकूण 1 हजार 590 जुड्या (300 ते 500 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्शी गाईंपैकी 35 गाईंची विक्री झाली.(20,000 ते 50,000 रुपये), 90 बैलांपैकी 55 बैलांची विक्री झाली (15,000 ते 30,000 रुपये), 125 म्हशीपैकी 105 म्हशींची विक्री झाली.