राज्यातील ‘या’ भागात 10 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज | पुढारी

राज्यातील 'या' भागात 10 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज

पुणे : राज्यासह देशाच्या बहुतांश भागात पाऊस कमी होत असून, 8 ऑगस्टनंतर देशातील 70 टक्के भागातून तो कमी होत आहे. दरम्यान, राज्यात फक्त कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

फक्त कोकण भागात पावसाचा जोर कायम असून, तेथे 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज आहे. तसेच ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगडपर्यंतच्या भागात 8 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. त्यानंतर पूर्वोत्तर भारत वगळता संपूर्ण देशात पावसाचा जोर कमी होणार आहे.

हेही वाचा

पुणे जिल्हा परिषद भरती : १००० जागांसाठी आजपासून अर्ज

नगर : अतिवृष्टी अनुदानात कर्मचार्‍यांचा दुजाभाव

नाशिक : रोकड-दागिन्यांसह फरार वधू पोलिसांच्या ताब्यात

Back to top button