अखेर ठरलं ! जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम या दिवशी होणार | पुढारी

अखेर ठरलं ! जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम या दिवशी होणार

जेजुरी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अखेर मुहूर्त लागला आहे. या आधी चार वेळा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द झाला होता. आता 7 ऑगस्ट रोजी जेजुरी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पहावी लागली होती. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

हे मार्ग राहतील बंद!

  • जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड आणि इतर वाहतुक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
  • पुण्याहून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा

नगर जिल्ह्यात 7 ऑगस्टपासून मिशन इंद्रधनुष

इंजिनिअरिंग न करताही या पठ्ठयाने मिळवली गुगलमध्ये इतक्या मोठ्या पॅकेजची नोकरी

कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीतील महिलेचा विनयभंग

Back to top button