पुणे : नाराणगाव परिसरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

पुणे : नाराणगाव परिसरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा :  नारायणगाव (ता.जुन्नर) येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून पसार झालेल्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नारायणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. त्यांच्याकडून पाच तोळे सोने व तीन घडयाळे असा एकुण २ लाख ९७ हजार ५०० रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (वय ३२ रा.नांद्रा ता.पाचोरा. जि. जळगांव), आकाश सुभाष निकम (वय २४ रा. नादा. ता.पाचोरा. जि. जळगांव),अमोल सुरेश चव्हाण (वय २८ रा. सामनेर. ता.पाचोरा. जि. जळगांव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नारायणगांव पोलिस ठाणे हददीत १४ मे रोजी नारायणगाव येथील डिमळे मळा येथे चोरी झाली होती. त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. हा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी सुचना दिल्या होत्या.  त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगांव पोलीस ठाणे यांनी संयुक्त ४ ते ५ पथके तयार करून वेगवेगळया ठिकाणी रवाना केली होती. घरफोडी झालेल्या परिसरातील सी.सी.टि.व्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी आरोपींनी वापरलेली स्वीप्ट गाडी धुळे जिल्ह्याच्या हद्दीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगावचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक सनिल धनवे, उपनिरीक्षक सावंत, हवालदार दिपक साबळे, नाईक संदिप वारे, मंगेश लोखंडे, मोमिन, जवान अवि वैदय, गोविंद केंन्द्रे, अक्षय नवले, महेश काठमोरे, शैलेश वाघमारे, कोतकर, ढेबरे, यांनी केलेली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news