

कामशेत(पुणे) : कामशेत पोलिसांनी अवैध गावठी बंदूक व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच, या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. रमेश सुरेश मानकर (वय 33, रा. वेल्हवळी, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांना नाणे गावच्या हद्दीत अवैध शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी छापा मारुन एका गोठ्यात लपवून ठेवलेले एक गावठी बंदूक व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच, रमेश मानकर याला अटक केली आहे. या घटनेचा तपास फौजदार शेख करत आहेत. या कारवाईत पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश पट्टे, उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार अब्दुल शेख, हवालदार गणेश तावरे, पोलिस नाईक सुहास सातपुते यांनी
कारवाई केली.
हेही वाचा