साहित्यप्रेमींसाठी नवे सभागृह अन् विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ; सभागृहाचे 8 ऑगस्टला लोकार्पण

साहित्यप्रेमींसाठी नवे सभागृह अन् विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ; सभागृहाचे 8 ऑगस्टला लोकार्पण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र साहित्य परिषदेने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे. नव्या रूपातील माधवराव पटवर्धन सभागृह आणि नव्याने निर्मिलेल्या कोहिनूर सभागृहाने मसापला वेगळे रूप प्राप्त करून दिले आहे. तर आता मसापच्या टेरेसवर नव्याने उभारलेल्या कल्याणराव जाधव सभागृहानेदेखील मसापची शोभा वाढणार आहे. कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचेही नूतनीकरण करण्यात आले असून, लवकरच विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथालयात सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली अभ्यासिकाही सुरू होणार आहेर्.ें

मसापच्या वास्तूला नवी झळाळी मिळाली आहे. दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांनी परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण करून दिले आहे. हे ग्रंथालय वातानुकूलित करण्यात आले असून, याच ग्रंथालयात कल्याणराव जाधव यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. 30 विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकणार आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

संदर्भ ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटायझेशन
एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा असलेले हे कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय लवकरच पूर्णतः संगणकीकृत होणार आहे. आतापर्यंत ग्रंथालयातील पाचशेहून अधिक दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन झाले असून, उर्वरित ग्रंथांचेही लवकरच डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

दामले यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मसापमधील कल्याणराव जाधव सभागृहाचे तसेच संदर्भ ग्रंथालयातील अभ्यासिकेचे उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे. राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news