राज्यात चार महिन्यांत 8 लाख 75 हजार दस्तनोंदणी, 131 कोटी 25 लाखांचा महसूल जमा | पुढारी

राज्यात चार महिन्यांत 8 लाख 75 हजार दस्तनोंदणी, 131 कोटी 25 लाखांचा महसूल जमा

शिवाजी शिंदे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात गेल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै ) 8 लाख 75 हजार दस्तांची नोंद झाली. त्यामधून सुमारे 131 कोटी 25 लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी याच काळात 8 लाख 80 हजार दस्तनोंदणी झाली होती. त्यामधून 160 कोटी महसूल मिळाला होता.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक आणि दोन गुठ्यांचे व्यवहार बंद केल्यानंतर (जर एनए असतील तरच व्यवहार होतो) काही प्रमाणात दस्तनोंदणीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सदनिका किंवा एन. ए. असलेले प्लॉटिंगची दस्तनोंदणी होत आहे.

राज्यात जीएसटीनंतर सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणजे दस्तनोंदणी विभाग आहे. मागील वर्षी 52 हजार कोटींचे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी 20 हजार कोटींहून अधिक महसूल राज्यातून जमा झाला होता. त्यानंतर एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. त्यास आता चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस राजयत 8 लाख 75 हजार दस्तनोंदणी झाली. तर त्यामधून 131 कोटी 25 लाख कोटींची महसूल जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाच लाखांनी दस्तनोंदणी कमी झाली आहे. तर महसूलात देखील 30 कोटींनी महसूल कमी झाला आहे.

हेही वाचा:

पुणे: महिलांना लुटणारी नांदेडची टोळी जेरबंद, कामाच्या आमिषाने मजूर अड्ड्यावरील महिलांना लुटायचे

पुणे: विनयभंगाच्या गुन्ह्यात सात वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक

ठरलं तर ! पुणेकरांची पाणीकपात टळली ; पालकमंत्र्याच्या बैठकीत निर्णय

 

Back to top button