पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पीकअप पलटी होऊन १ ठार | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पीकअप पलटी होऊन १ ठार

अजय कांबळे

कुरकुंभ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत एका पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील दोन सख्या भावांपैकी एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी (दि. २६) रात्री पावणेएकच्या दरम्यान हा प्रकार घडला. राधेश्याम देवराव वानखडे (वय २५, सध्या रा. लोणी काळभोर, ता. हवेली. मुळ रा. कमलापूर ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर अशोक देवराव वानखडे (वय ३५) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, पिकअप (एमएच १२ युएम ०३०४) या वाहनांमध्ये लोणी काळभोर येथून गुळाचा माल घेऊन बार्शीकडे जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअपचा अपघात झाल्याने पिकअप रस्त्यावर पलटी झाला. या घटनेत पिकअपमधील अशोक वानखडे यांना किरकोळ दुखापत झाली. राधेश्याम वानखडे यांना जबर मार लागल्याने ते मृत्यूमुखी पडले.

हेही वाचा

मेट्रोने आता कोथरूड ते पिंपरी प्रवास शक्य?

कार्ला : इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ

पिंपरी : कंट्रोल फोनअभावी कळेना रेल्वे ट्रेनचे ‘लोकेशन’

Back to top button