पुण्यात खळबळ : सहायक पोलिस आयुक्ताने पत्नी, पुतण्याचा गोळी झाडून केला खून | पुढारी

पुण्यात खळबळ : सहायक पोलिस आयुक्ताने पत्नी, पुतण्याचा गोळी झाडून केला खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

Back to top button