पुणे : पार्सलमध्ये ड्रग्जच्या बहाण्याने लूट | पुढारी

पुणे : पार्सलमध्ये ड्रग्जच्या बहाण्याने लूट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरिअरद्वारे पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज (अमली पदार्थ) असल्याचे सांगून अटक होण्याच्या धाकाने सायबर चोरट्यांनी एका तरुणीला 3 लाख 80 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. ही घटना 12 जुलैला दुपारी तीन वाजताच्या सुमारास ऑनलाईन माध्यमातून घडली आहे. याप्रकरणी, पाटीलनगर, बालेवाडी येथील 28 वर्षीय तरुणीने चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुणी ही शहरातील एका खासगी कंपनीत काम करते. सायबर चोरट्याने तिच्यासोबत मोबाईलद्वारे संपर्क करून तिने एका कुरिअर कंपनीमार्फत तैवान येथे पाठविलेल्या पार्समध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगितले. त्यानंतर अटक होण्याची भीती दाखवून पैसे भरण्यास भाग पाडले.

हे लक्षात ठेवा…
सायबर चोरट्यांनी गंडा घालण्यासाठी शोधून काढलेली ही एक नवीन क्लृप्ती आहे. ते तुमच्याशी संपर्क करतात. ते तुम्हाला सांगतात एकतर तुमच्या नावे विदेशातून एक पार्सल आले आहे किंवा तुम्ही ते पाठवले आहे. त्यामध्ये अमली पदार्थ आहेत. तुम्हाला पोलिस अटक करून शकतात. तसेच, अनेकदा तेच पोलिस असल्याचीदेखील बतावणी करतात.

Back to top button