पुण्यात आज मुसळधारेचा अंदाज | पुढारी

पुण्यात आज मुसळधारेचा अंदाज

पुणे : घाटमाथ्याला शनिवारी रेड अलर्ट देण्यात आल्याने शहरातही मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन दिवसांपासून हवामान विभागाने घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे. मात्र, शहरात फार मोठा पाऊस झाला नाही. शहरात सरासरी 2.5 ते 4.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारीही घाट माथ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी झालेला पाऊस : शिवाजीनगर : 2.6, पाषाण :4.8, लोहगाव : 2.6, चिंचवड : 6.5, मगरपट्टा : 0.5

Back to top button