पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचा सत्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सभासदांच्या ज्या पाल्यांनी क्रीडा क्षेत्रात व इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले अशा एकूण 150 पाल्यांचा संघातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना महाराष्ट्र राज्याचे माजी वित्त आयुक्त विशाल भेदुरकर व पुणे शहर व पिंपरी-चिंचवड भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले यांच्यासह सर्व विश्वस्त, विभाग प्रमुख, पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत तांबे यांनी केले.
विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी…
1) अक्षय प्रशांत गणपुले –
(राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार)
2) आदिती प्रमोद डोंगरे –
(राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण पदक)
3) वृषभ रेवणप्पा चिकमळ –
(स्केटिंगमध्ये ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद)
4) क्षितिजा यतीन चौधरी -(हॉटेल मॅनेजमेंट आणि
केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम क्रमांक)
5) प्रतीक ज्ञानोबा वांजळे -(एलएलबी उत्तीर्ण)
6) अनुजा दीपक निवंगुणे-(आर्कीटेक्चर परीक्षेत प्रथम क्रमांक)
7) सिध्देश प्रशांत जंगम -(आर्कीटेक्चर परीक्षेत प्रथम क्रमांक)
8) युक्ता अरुण पिसे -(आर्कीटेक्चर परीक्षेत प्रथम क्रमांक)
दहावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी…
1) शशांक महादेव नेमाणे
2) ऋतुजा दीपक गायकवाड
3) सारंग यतीन चौधरी
4) श्रेया पंकज भोसले
5) नचिकेत किशोर मुधोळ
बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी…
1) सानिका संतोष वीर
2) कृतिका नितीन निंबाळकर
3) तनिष्का दशरथ सरोदे
हेही वाचा :
Josephine Chaplin : चार्ली चॅप्लिन यांची मुलगी जोसेफिन चॅप्लिन यांचे ७४ व्या वर्षी निधन
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा, गंगाथरन डी. यांची बदली