तळेगाव येथे आपत्तीकालीन परिस्थितीबाबत डेमो कॅम्प | पुढारी

तळेगाव येथे आपत्तीकालीन परिस्थितीबाबत डेमो कॅम्प

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील तळे येथे १९ जुलैला पूरजन्य, आपत्तीकालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत पोलीसांच्यावतीने डेमो कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्पमध्ये ग्राम सुरक्षा दल सदस्य आणि वन्यजीवन रक्षक मावळ संस्था सहभागी झाले होते. राणी ॲम्बुलन्स, विरा ॲम्बुलन्स, बोट फायर ब्रिगेडगाडी आदी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आला. एखादी व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह किशोर पाटील, प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंढे, अर्चना पानसरे, वैशाली बोरकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, जीगर सोळंकी, सर्जेस पाटिल, विनय सावंत, शुभम काकडे, आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा

धक्कादायक! आळंदीत प्लॅस्टिक पिशवीत आढळले एक दिवसाचे अर्भक

पिंपरी चिंचवड शहरातील खोदाई केल्याने रस्ता खचला; जीवितहानी नाही

जळगाव : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा, दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

Back to top button