भोर येथे पावसाची संततधार ; ओढे, नाले, नद्यांना पुराचे स्वरूप | पुढारी

भोर येथे पावसाची संततधार ; ओढे, नाले, नद्यांना पुराचे स्वरूप

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर तालुक्यात सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्‍यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील ओढे, नाले, नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. डोंगरमाथ्यावर सर्वाधिक पावसाची नोंद झाली असल्यामुळे हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देत प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान विभागाने दि. 18 ते 22 जुलैदरम्यान पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवार (दि. 18) पासून भोर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. भोर तालुक्यात सर्वाधिक पाऊस शिरवली हि. मा. येथे सुमारे 142 मिलिमीटर झाला. पावसामुळे भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाट, भोर-मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिंड घाट परिसरात डोंगरदर्‍यांतून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत आहेत. ओढे, नाले भरून वाहत आहेत. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, अधिक पाऊस असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धरणातील आजची पाणीपातळी
धरण पाणीसाठा (टक्केवारी)
निरा देवघर 36.25
भाटघर 32.73
गुंजावणी 33 टक्के

Back to top button