पुणे : गुन्हेगारांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; 41 जणांना कौशल्य विकासाचे धडे | पुढारी

पुणे : गुन्हेगारांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; 41 जणांना कौशल्य विकासाचे धडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या अल्पवयीन मुलांना (विधिसंघर्षित) बाहेर काढून त्यांचे परिवर्तन सुरू केले असून, तिघांना नोकरी देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांकडून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी शंभर ते दीडशे मुलांना एकत्रित आणत त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर एकाही मुलाने गुन्हा केला नसल्याचे दिसून आले आहे.

मुलांच्या हाताला कामदेखील देण्यास सुरुवात केली. नुकताच पोलिसांनी यासंदर्भात कार्यक्रम घेत तीन मुलांना नोकरी मिळवून दिली. तर, 41 मुलांना स्कील डेव्हलपमेंटचे शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उपक्रमात शंभर ते दीडशे मुलांनी सहभाग घेतला होता. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे.

उपक्रमाला परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, तसेच मल्टी जिनिअस प्रोफेशनल प्रायव्हेट लिमिटेड या कन्सल्टंट कंपनीचे फिरोज शेख, एम. एम. इंटरप्रायझेस या कंपनीचे प्रशांत तांबोळी, कश्मिरी रहिवासी व समुपदेशक जाहीद भट व अ‍ॅड. रूपाली थोपटे, समाजसेवक विक्रांत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा :

घोषित दूध दर न दिल्यास  कोणती कारवाई होणार?

Monsoon sessions : अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडू; विरोधी पक्षांचा इशारा

Back to top button