राज्याला अतिवृष्टीचा इशारा ; कोकण, मध्य महाराष्ट्राला तीन दिवस ऑरेंज अलर्ट | पुढारी

राज्याला अतिवृष्टीचा इशारा ; कोकण, मध्य महाराष्ट्राला तीन दिवस ऑरेंज अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  मध्य भारतात रविवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात आगामी पाच दिवस पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मंगळवार ते गुरुवार (18 ते 20 जुलै) या कालावधीत कोकण व मध्य महाराष्ट्र, तर सोमवारी विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पाकिस्तानात तयार झालेला पश्चिमी चक्रावात, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती अशा अनुकूल वातावरणामुळे मध्य भारतात मान्सून रविवारपासून सक्रिय झाला.

त्यामुळे महाराष्ट्रात रविवारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. 18 ते 20 जुलै दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भाला 17 रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सून ट्रफ उत्तर भारतातून हळूवार मध्य प्रदेशच्या दिशेने येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात 17 ते 22 जुलै या कालावधीत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयासह राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, गिलगिट, बाल्टीस्तान, मुजफ्फरपूर या भागात अतिवृष्टी होत आहे. मध्य भारतात पाऊस वाढल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट
कोकण : अतिवृष्टी (18 ते 20 जुलै )
विदर्भ : 17 जुलै : अतिवृष्टी
मराठवाडा : 17 ते 20 जुलै : मध्यम पाऊस
मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) : अतिवृष्टी (18 ते 20 जुलै )

हेही वाचा :

संसदेत बोलूच दिले जात नाही : वंदना चव्हाण

प्रवासी संख्येत नागपूर-बिलासपूर वंदे भारत प्रथम

Back to top button