त्यानुसार महापालिकेच्या आणि हवाई दलाच्या पथ विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. दरम्यान स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी येथील बर्माशेल झोपडपट्टीला धक्का न लावता पर्यायी रस्ता सुचवावा, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने दोन पर्यायी रस्त्यांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यात 24 मीटर रुंदीचा दीड कि. मी.चा आणि एक कि. मी.चा एक असे दोन रस्ते असून, हे प्रस्ताव संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सादर करण्यात आले. संरक्षण विभागाकडून त्यास परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.