मंचर : नियंत्रण सुटल्याने खोल दरीत बस कोसळली; ३ जण गंभीर | पुढारी

मंचर : नियंत्रण सुटल्याने खोल दरीत बस कोसळली; ३ जण गंभीर

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर येथून कल्याणकडे जाणारी एसटी महामंडळाची बस आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून थेट आठ ते दहा फूट खाली कोसळली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून 24 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. या बस मधून एकूण ३५ प्रवासी प्रवास करत होते. अपघात स्थळी तातडीने जाऊन गिरवली चे सरपंच संतोष सैद यांनी प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भीमाशंकर येथून कल्याणकडे निघालेल्या बसला गिरवली गावाजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस आठ ते दहा फूट खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले. तसेच पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.

आरोग्य विभागाच्याही रूग्णवाहिका तत्काळ दाखल झाल्याने मोठा धोका टळला आहे. एस टी बसच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे माहिती.समोर येत असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने एकच धावपळ उडाली होती.

Back to top button