पुणे : ससूनमध्ये असल्याचे सांगून तोतयाने केला महिला डॉक्टरवर बलात्कार - पुढारी

पुणे : ससूनमध्ये असल्याचे सांगून तोतयाने केला महिला डॉक्टरवर बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ससून रुग्णालयात डॉक्टर म्हणून नोकरीस असल्याची बतावणी करून एका महिला डॉक्टरवर तोतयाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे संबंधीत महिलेसोबत जबरदस्तीने घरात लग्न करून आणि त्यांच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवत या महिलेची तब्बल 16 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पतीला दिली ठार करण्याची धमकी

महिलेने या प्रकाराची वाच्यता कोठे करू नये म्हणून या तोतया डॉक्टरने महिलेचे अश्लिल फोटो इतरांना पाठवले. तसचे स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेईन असे म्हणत महिलेच्या पतीला जीवे ठार मारण्याची आणि अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी, विमानतळ पोलिसांनी तोतया डॉक्टर नायका रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय. 33, रा. विमानगर पुणे, मुळ. जालना) याला अटक केली आहे. याबाबत एका 29 वर्षीय डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च २०२१ ते २६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडला.

हेदेखील वाचा

बनावट धनादेश पुण्यात वटविण्याचा प्रयत्न

भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे

रेकी करून सराफांना लुटणार्‍या दोघांना बेड्या

महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण अडचणीत?

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा

Back to top button