Pune News : विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन 17 जानेवारीला | पुढारी

Pune News : विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन 17 जानेवारीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे येत्या 17 जानेवारीला 123 व्या नियमित पदवी प्रदान समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यावर्षी तब्बल 1 लाख 5 हजार 654 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

विद्यापीठातर्फे वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यामुळे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. अखेर 17 जानेवारीला विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होणार आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच पदवी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. तसेच 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना पी.सी अ‍ॅलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनय सहस्त्रबुध्दे उपस्थित राहणार आहेत. काही विद्यार्थ्यांना पोस्टाने तर काहींना त्यांच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.

असे आहेत विद्यार्थी…

  • एम.फिल. – 04
  • पीएच.डी. – 187
  • पदविका प्रमाणपत्र घेणारे विद्यार्थी – 226
  • पदवी प्रमाणपत्र घेणारे विद्यार्थी – 85 हजार 440
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र घेणारे विद्यार्थी – 19 हजार 763
  • पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र घेणारे विद्यार्थी – 34
  • एकूण – 1 लाख 5 हजार 654

हेही वाचा

 

Back to top button