पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मांसाहारी पदार्थांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आखाड पार्ट्यांवर झाला आहे. या पार्ट्यांचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. एरवी शेतात किंवा वस्तीवर होणार्या या पार्ट्यांचाही जोर कमी झाला आहे. इंधन व खाद्यतेलाचे दर वाढले की, हॉटेलमधील मांसाहारी पदार्थांचे दर वाढतात. आखाडमुळे मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले असले तरी मांसाहारी पदार्थांचे भाव तेच आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पार्टी करण्याच्या बेतावर विरजण पडत आहे.
आषाढ महिन्यात गावरान कोंबडा, कोंबडी यांना जास्त मागणी असते. त्यामुळे त्याचे भाव वाढले आहेत. तसेच बोकडाची संख्याही वरचेवर कमी होत असल्याने त्याचेही भाव भरमसाठ वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बकर्याच्या मांसापेक्षा ग्राहकाची पसंती चिकन व माशांना अधिक प्रमाणात असल्याचे दिसत आहे.
अंड्याचा सध्या तुटवडा असला तरी श्रावण महिन्यात भाव स्थिर राहतील, असे पळसदेव येथील चिकन व अंडी विक्रेते विकास भोसले यांनी सांगितले. आषाढ महिन्यात मांसाहार करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी मटन, मासे, अंडी, चिकन या मांसाहारी पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भावही चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे मांसाहारीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.
बोकडाचे मटन : 600 ते 630 रुपये
चिकन : 200 ते 220 रुपये
मासे : 100 ते 120 रुपये
गावरान कोंबडा : 600 ते 650 रुपये नग
गावरान कोंबडी : 450 ते 500 रुपये नग
विलायती अंडे : 7 रुपये नग, 84 रु.
हेही वाचा