गृहप्रकल्पांना बेकायदा नळ कनेक्शन

गृहप्रकल्पांना बेकायदा नळ कनेक्शन
Published on
Updated on

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  वडगाव नगरपंचायत हद्दीत असणार्‍या काही गृहप्रकल्पांना बेकायदा नळ जोडणी देण्यात आली आहे. पाणीपुरवठा सभापतींची कोणतीही परवानगी व ठराव न घेता परस्पर ही अनधिकृत नळ जोडणी कोणी व कोणाच्या सांगण्यावरून केली याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपनगराध्यक्षा सायली रूपेश म्हाळसकर यांनी दिली.

वॉटर ऑडिट प्रस्तावाकडे दुर्लक्ष
वडगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणीचोरीचे प्रकार काही मंडळींच्या आशीर्वादाने व पाणीपुरवठा कर्मचार्‍यांच्या संगनमताने सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा सभापती या नात्याने अनेकदा रंगेहाथ पकडून नगरपंचायत प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले होते. अनधिकृत नळ जोडणीला चाप लावण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी केला आहे.

शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने उपनगराध्यक्षा म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायत हद्दीत असणार्‍या गृह प्रकल्पांना बेकायदा दिलेल्या जलवाहिनीची स्वतः जाऊन पाहणी केली. या पाहणीत कातवी येथील आयुष पार्क व वडगाव येथील नाईकनवरे या गृह प्रकल्पांना

मुख्य जलवाहिनीवरून
मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे नळजोड देण्यात आले असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या फाइलीत अडकून ठेवून अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी हेलपाटे मारायला लावणार्‍या पाणीपुरवठा अधिकार्‍यांना बिल्डर व धनिकांना बेकायदा पाणी देताना याच नियमांची आठवण का झाली नाही? सर्वसामान्य नागरिकांकडून वेळेत कर वसूल करणारे नगरपंचायत प्रशासन आता या पाणी चोरांकडून अवैधरीत्या वापरलेल्या पाण्याचा कोणता व कसा टॅक्स वसूल करणार ?
                                                 – सायली रुपेश म्हाळसकर, उपनगराध्यक्षा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news