तळेगाव येथे खोदलेल्या चा-या बुजविणेत हलगर्जीपणा | पुढारी

तळेगाव येथे खोदलेल्या चा-या बुजविणेत हलगर्जीपणा

तळेगाव दाभाडे (पुणे ) : स्टेशन परिसरात सिध्दार्थ नगर येथून इंद्रायणीवसाहतीच्या ,जोशीवाडीच्या काही भागातून म्हाडाच्या ईमारतींकडे जाणा-या पाण्याच्या पाईप लाईनच्या कामासाठी परिसरात अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेले डांबरीकरण फोडून चा-या आणि मोठमोठे खड्डे खोदलेले आहेत. परंतु ते पूर्वीप्रमाणे व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत या बाबत हलगर्जीपणा झालेला दिसून येत आहे. त्यावरील दगड धोंडे-गोठेही काढलेले नाहीत यामुळे तेथे पाणी साचून चिखल होत असल्यामुळे निसरडेपणा येत असल्यामुळे राडारोड होत आहे.

पादचा-यांना,वाहन चालकांना, जेष्ठ नागरिकांना,महिलांना फारच त्रासदायक होत आहे.यामुळे अनेक वृध्द,लहान मुले पाय घसरुन पडली आहेत.तसेच तेथे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांच्या व्यावसायांवरही विपरीत परीणाम होत आहे. अगोदरच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत,रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा,(झाडांच्या फांद्या,पालापाचोळा आदी)उचलण्यात येत नाही यामुळे नागरिक हैराण झाले असुन त्यात या पाईप लाईन साठी खोदलेल्या चा-यांची आणि खड्डयांची भर पडत आहे.तरी या बाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

Back to top button