महत्वाची बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

महत्वाची बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडललेल्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने एक जीआर काढला असून त्या पत्रामध्ये निवडणुकीचा उल्लेख केला असून या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटले आहे.

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरआणिऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक लगबगीने तयारी सुरु करतील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news