पीएमपीचे अध्यक्ष बकोरिया यांची बदली, नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग | पुढारी

पीएमपीचे अध्यक्ष बकोरिया यांची बदली, नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. आता नवे अध्यक्ष म्हणून सचिंद्र प्रताप सिंग पदभार स्वीकारतील. अवघ्या नऊ महिन्यांचा कार्यकाळातच ओम प्रकाश यांची बदली केल्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. कामगार हितासाठी आणि पीमपीच्या विकासासाठी काम केल्यामुळे बकोरिया यांनी कामगारांच्या मनात घर केले होते. त्यांच्या बदलीमुळे पीमपीच्या विकासाला मोठी खीळ बसली असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बकोरिया यांच्या कार्यकाळातील कामे….
– सातवा वेतन आयोग लागू
– मार्गांचे सुसूत्रीकरण
– पीएमआरडीएकडून संचलन तूट मिळवली
– कर्मचाऱ्यांचे आठवड्याला बैठक घेऊन प्रथमच प्रश्न सोडविले
– ठेकेदाराना शिस्त लावली
– नवीन बस खरेदी धोरण – मुख्यत्वे स्व:मालकीच्या बस खरेदीवर भर देण्यासाठी प्रयत्न केले
– पदोन्नती, भरती प्रक्रियेचे नियोजन
– महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
– स्व:मालकीच्या ज्यादा गाड्या रस्त्यावर उतरविल्या

Back to top button