त्यात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बॅंक, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आजी माजी पदाधिकाऱयांसह अगदी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, विकास सोसायट्यांचे संचालक यांचा समावेश आहे. या पदाधिका-यांशिवाय तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यासाठी मंगळवारी बारामतीत बैठका घेण्यात आल्या होत्या. लक्झरी बस, खासगी मोटारींची व्यवस्था करण्यात आली होती.