राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या | पुढारी

राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअधीक्षक अभियंता यांच्यासह सुमारे 95 अधिका-यांच्या बदल्या राज्य शासनाने नुकत्याच केल्या आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकार्‍यांना एक वर्षाची मुदतवाढदेखील दिली आहे. बदलीचे आदेश जलसंपदाच्या विभागाच्या अवर सचिव राखी चव्हाण यांनी काढले आहेत. राज्यातील राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषत: जलसंपदा विभागात झालेल्या बदल्यांना त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांची बदली मुंबई मंत्रालय येथे झाले असून, त्याच्या जागी संजीव चोपडे यांची मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. याबरोबरच पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी कुमार पाटील यांची बदली झाली आहे. त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर या पदावर कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांची बदली झाली आहे.

राजकीय घडामोडीमुळे अधिकार्‍यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र, नियमानुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्यातील जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअधीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत.

  • संजीव चोपडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता
  • पुण्यातील अधीक्षक अभियंता कोल्हे यांच्यासह कार्यकारी अभियंत्यांची बदली
  • पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी कुमार पाटील

पुण्यातील बदल्या

(अधिकारी/ सध्याचा विभाग/बदली विभाग)

  • विजय पाटील(कार्यकारी अभियंता/ खडकवासला पाटबंधारे / खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण (जि. रायगड).
  • सीमा सचिन मोहिते, कार्यकारी अभियंता / कृष्णा पाणीवाटप तंटा लवाद (गट क्रमांक-4) /दक्षता पथक पुणे.
  • नामदेव शंकर करे, कार्यकारी अभियंता/ भामा आसखेड धरण (बांधकाम) विभाग/ एक वर्ष मुदतवाढ.
  • शैलजा अतुल सुलाखे, उपअधिक्षक/पाटबंधारे प्रकल्प मंडळ/माहिती व्यवस्थापन व प्रशिक्षण विभाग, मुंबई.
  • संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता/ डिंभे धरण विभाग/भीमा विकास विभाग क्रमांक-2, सोलापूर.
  • दिगंबर महादेव डुबल, कार्यकारी अभियंता / निरा देवघर प्रकल्प/ पुणे पाटबंधारे विभाग.
  • निधी गजेंद गजबे, कार्यकारी अभियंता/दक्षता पथक पुणे /मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभ क्षेत्र विकास, छत्रपती संभाजीनगर.
  • प्र. प्रा.कडुसकर, कार्यकारी अभियंता / कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-1 चे/निरा उजवा कालवा, फलटण.
  • आसावरी प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता/राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कक्ष-2 पुणे/उपअधीक्षक अभियंता गुण नियंत्रण मंडळ, पुणे.
  • वैशाली बाळासाहेब तामगावे, कार्यकारी अभियंता / बांधकाम व्यवस्थापन संगणकीकरण विभाग पुणे/महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ.
  • शिवाजी दिनकरराव जाधव/गुण नियंत्रण विभाग/उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग.
  • राजेंद्रकुमार धोडपकर, कार्यकारी अभियंता / पुणे पाटबंधारे विभाग (सिंचन)/ डिंभे धरण विभाग.
  • प्रवीण कोल्हे (अधीक्षक अभियंता)

खडकवासला अधीक्षक अभियंता पदावर कोण ?

पुणे शहर आणि जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले खडकवासला पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अधीक्षक अभियंता या पदावर अजून कोणत्याही अधिकार्‍यांची नियुक्ती झाली नाही. या पदावर कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांची सात ते आठ महिन्यांपूर्वी पदोन्नतीने मुख्य अभियंता या पदावर नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून या पदाचा तात्पुरता पदभार जगताप यांंच्याकडे आहे. मात्र, सर्व बदल्यांमध्ये या अधिकार्‍याची नियुक्ती होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदी अशोक किंवा करंदलाजे; येडियुराप्पांचा प्रस्ताव

पवारांच्या घरात वाद, कार्यकर्ते संभ्रमात

पुढारी कस्तुरी क्लब आणि स्टार प्रवाह ’कस्तुरी वर्धापन उत्सव’

Back to top button