शिक्रापुरात लग्नाच्या आमिषाने बलात्कार | पुढारी

शिक्रापुरात लग्नाच्या आमिषाने बलात्कार

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथे पतीपासून विभक्त राहणार्‍या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.2) अजित दत्तात्रय साळुंके याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. शिक्रापूर (ता.शिरूर) येथील पीडिता काही कारणास्तव पतीपासून विभक्त राहत असताना तिची ओळख अजित साळुंकेबरोबर झाली.

दोघांची ओळख वाढत गेल्यानंतर अजित महिलेला आपण लग्न करू, असे आमिष दाखवत तिच्यासोबत राहू लागला. महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून महिलेवर अत्याचार केला. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता अजित तिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून निघून गेला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अजित साळुंके (वय 29 वर्षे, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे तपास करत आहेत.

हेही वाचा

Hasan Mushrif : पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे येण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली ; भाजप, सेना की, राष्ट्रवादी?

मिम्सचा पाऊस : किरीट सोमय्या कागलच्या उरुसाला येणार!

Back to top button