पुणे : आंबेगाव पूर्वेला पावसाला सुरुवात

पुणे : आंबेगाव पूर्वेला पावसाला सुरुवात

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या आडसाली उसाची लागवड शेतकर्‍यांनी हाती घेतली आहे. सध्या शेतात उसाचे बियाणे आणणे, ते साळणे, तसेच जागोजागी सरींमध्ये पसरवून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग वाढलेली दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात घोड व मीना नद्यांच्या पात्रामुळे परिसर बागायती बनला आहे, त्यामुळे पारगाव, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसर, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकाकडे प्रामुख्याने वळला आहे.

शेतकरी हे उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. इतर पिकांच्या तुलनेत उसाला सातत्याने बाजारभावाची चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ऊस पिकालाच प्राधान्य देत आहेत. शेतकरी हे दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर करतात. यंदादेखील लागवडीची तयारी जोरात सुरू केली; परंतु पावसाने उशिराने हजेरी लावली, त्यामुळे आडसाली उसाच्या लागवडी खोळंबल्या होत्या. आता पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या शेतशिवारात शेतकर्‍यांनी उसाचे बियाणे आणून शेतात पसरवून ठेवले आहे. तर काही
शेतकर्‍यांनी उसाची लागवड देखील सुरू केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news