पुण्यात 15 दिवसांत बरसला खरं ‘बॅकलॉग’ ठेवूनच ! | पुढारी

पुण्यात 15 दिवसांत बरसला खरं ‘बॅकलॉग’ ठेवूनच !

पुणे : गुरुवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली असली तरीही शहराचा एकूण पाऊस 77 मि. मी. वर गेला आहे. शहराची जूनची सरासरी 150 मि. मी. असून 48 टक्के पावसाची जूनमध्ये तूट आहे. शहरात 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. तो 28 जूनपर्यंत रोज पडत होता. गुरुवारी त्याने विश्रांती घेतली. गेल्या चोवीस तासांत शहरात 10 मि. मी. पावसाची नोंद होताच शहरातील एकूण पाऊस 77 मि. मी. इतका झाला आहे. गुरुवारी शहरात खूप कमी पाऊस झाला. सायंकाळी 6 पर्यंत शिवाजीनगर 0.9, पाषाण 1.2, लोहगाव 1.8, चिंचवड 1.5 मि. मी. अशी पावसाची नोंद झाली. संध्याकाळी 6 ते रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरु होता.

Back to top button