सोमेश्वरनगर : गडदरवाडीतील कंपनीविरोधात ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

सोमेश्वरनगर : गडदरवाडीतील कंपनीविरोधात ग्रामस्थ आक्रमक

सोमेश्वरनगर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : गरदडवाडी (ता. बारामती) येथील रॅप्टोक्रॉस ब—ेट कंपनी गेल्या 20 वर्षांपूर्वी घोड्यांच्या मलमूत्रापासून औषधे तयार करण्यासाठी गरदडवाडी येथे सुमारे 318 एकर जागेत स्थापन झाली आहे. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून कमी करणे, ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करणे, मोठमोठी शेततळी निर्माण करून अवैधरीत्या मुरूम व माती उत्खनन करणे, कंपनीलगत असणार्‍या शेतातून मोठे चर खोदून पाईपलाईन करणे, ग्रामपंचायतीला कर न देणे याबाबत गडदरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

कंपनी स्थापनेवेळी कंपनीने ग्रामपंचायत गरदडवाडी व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. मात्र, आता कंपनीची सर्व आश्वासने हवेत विरली आहेत. थोड्याच कालावधीनंतर स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून कमी करणे, ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता ओढ्यातून जवळपास दीड किलोमीटर पाईपलाईन नेली आहे, यामुळे ग्रामस्थांमध्ये कंपनी विरोधात असंतोष निर्माण झाला असून, ग्रामस्थ कंपनीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

कंपनीलगतच्या ओढ्यामध्ये केलेल्या पाईपलाईनमुळे पूर्ण ओढाच बुजला गेला असून, त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी ओढ्यात न येता लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्रामपंचायतीने कंपनीशी पत्रव्यवहार केला असून, यावर कंपनी प्रशासनाने कोणतीच हालचाल केलेली नाही. कंपनी चालू झाल्यानंतर स्थानिक 120 भूमिपुत्र कामगार कामावर होते; मात्र आता काही ठराविक कामगार तटपुंज्या पगारावर काम करत आहेत. कंपनीस ग्रामपंचायतीचा कर भरणे बंधनकारक असूनही कंपनीने सन 2013 पासून कोणताही कर ग्रामपंचायतीकडे जमा केलेला नाही. कंपनीने काही ठिकाणी वनविभाग व शेतकर्‍यांच्या जमिनींवर अतिक्रमण केलेले आहे.

कंपनीच्या या दंडेलशाहीविरोधात ग्रामस्थ यांनी तीव— आंदोलनाचा इशारा दिला आहे.संबंधित कंपनीने कोणतीही परवानगी न घेता ओढ्यातून बेकायदेशीरपणे व अनधिकृतपणे पाईपलाईन नेली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. शासनाने पाईपलाईन करणार्‍या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी. – मालन गडदरे, सरपंच, गडदरवाडी

ग्रामपंचायतीने केलेला अर्ज चुकीचा आहे. पाण्याची पाइपलाइन फोडण्यात आली असून, ती फोडायला नको होती. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. फुटलेली पाइपलाइन जोडली आहे. – अमोल मदने, व्यवस्थापक, रॅप्टोक्रॉस ब—ेट कंपनी

Back to top button