पिंपरी : थेरगावमध्ये वाहतुकीत बदल | पुढारी

पिंपरी : थेरगावमध्ये वाहतुकीत बदल

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत बुधवारी (दि. 28) पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत. सोळा नंबरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणार्‍या सेवा रस्त्याची रुंदी कमी आहे. त्याच ठिकाणाहून पवारनगर गल्ली व थेरगावकडे जाणारी लेन आहे. त्यामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे कावेरीनगर सब-वे मधून मोटारसायकल, रिक्षा वगळता अन्य सर्व वाहनांना बंदी करण्यात आली आहे. कावेरीनगर सब-वे कडून काळेवाडी फाट्याकडे जाणारी वाहने गुजरनगर अंडरपास येथून इच्छित स्थळी जातील. तसेच 16 नंबरकडून वेणुनगर, कावेरीनगरकडे जाणारी वाहने काळेवाडी फाटा येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जातील.

थेरगाव येथील बदल तात्पुरत्या स्वरुपात आहेत. याबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना असल्यास 9 जुलैपर्यंत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेत लेखी स्वरुपात कराव्यात. त्यानंतर अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. पवारनगर गल्ली नंबर एकच्या सुरुवातीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला काका वडेवाले व यशराज हेअर सलून समोर 50 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.

हेही वाचा

पिंपरी : पहिल्याच पावसात संसर्गजन्य आजारांत वाढ

पुणे शहरात दुसर्‍या दिवशीही संततधार

पिंपरी : परप्रांतातील केवळ 1425 वाहनांची ‘आरटीओ’कडे नोंद

Back to top button