

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयातील 36 वर्षीय प्राध्यपिकेचा विवस्त्र व्हिडिओ, फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या पतीकडे पाच हजार यूएस डॉलर्सची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार एका विद्यार्थ्याने केला. याप्रकरणी बिहार येथील एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मार्च 2020 पासून 26 जून 2023 या कालावधीत घडला. तक्रारदार पीडित महिला या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करते.
त्यांचा विद्यार्थी मयांक सिंग याने त्यांच्याशी सतत इन्स्टाग्रामवर संर्पकात राहून मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेच्या इच्छेविरुध्द मोबाईलवर व्हॉटसअप कॉल करून तुम्ही जर मी सांगतो तसे केले नाही तर तुमची आपल्या महाविद्यालयात बदनामी करेन, अशी भीती घातली. त्यानुसार प्राध्यापिकेस कपडे काढण्यास भाग पाडून व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तो व्हिडिओ व्हायरल केला. एका इन्स्टाग्राम आयडीधारकाने संबंधित पीडितेस अनेक ऑडिओ व व्हिडिओ कॉल करून रॉवीन नावाच्या इन्स्टाग्राम आयटीधारकाने हा न्यूड व्हिडिओ महिलेच्या पतीस पाठवला. त्यांच्याकडे पाच हजार यूएस डॉलर्सची मागणी करून पैसे दिले नाही तर न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बदनामी केली. याबाबत हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. गांधले पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा :